अवचटकाकांना सादर भावांजली. मोठं माणूस गेलं.
Thursday, January 27, 2022
Wednesday, January 26, 2022
मुलं 'मेरा रंग दे बसंती चोला'वर सुंदर नाचतायत. झेंड्याला साक्षी ठेवून राष्ट्रगीत गाण्यासारखं सुख कशातही नाही. इस्त्रीचे कडक गणवेश घालून आवरून - मुली तर केसात ताजे गजरे माळून - साडेसातच्या ठोक्याला शाळेत पोहोचायच्या आनंदापुढे सकाळच्या गडद थंडीची कुणालाही पर्वा दिसली नाही. हे बळकट देखणं चित्र भारतीय प्रजासत्ताकासारखंच निरंतर राहू दे ![]()
Saturday, January 22, 2022
Saturday, January 15, 2022
रविवारची कामं उरकताना रेडिओवर चांगलं ऐकायला मिळावं ही पर्वणी असते. बिग एफ एम वाहिनीवर मुलुंडच्या रंगकौशल्य मोफत वाचनालयाच्या रमेश मेश्रामांची जाहिरातींचा भडीमार नसलेली त्यांना व्यवस्थित बोलू दिलं गेलेली मुलाखत, पाठोपाठ भावना सोमय्यांचा चित्रपट कलावंतांशी संबंधित किश्श्यांवर आधारित कार्यक्रम, ह्या सगळ्यात अधेमधे वाजवली जाणारी बरी गाणी. भावना सोमय्यांच्या जी मासिकाचा कधीकाळी फडशा पाडलेला आहे. अन्नु कपुरांप्रमाणेच त्यासुद्धा फार लाडीक न होता नीट सुरस बोलतात सांगतात. मेश्रामांची मुलाखत आवडली, ऐकून तरी खूप आवडला हा उपक्रम.
Tuesday, January 11, 2022
Sunday, January 9, 2022
पं. रामदास कामतांना मनःपूर्वक अभिवादन. श्रद्धांजली, आदरांजली हे शब्द अगदी नको वाटतात.
Thursday, January 6, 2022
कोविडछायेमुळे खंडीत झालेल्या नित्यभेटी यथावकाश मूळपदावर येत आहेत. आज अविला आठवत नाईलाजाने त्याच्या परोक्ष का असेना त्याची पुरेपूर मापं काढत त्याचा यथेच्छ समाचार घेणे हा मुख्य अजेंडा होता. तो कव्हर करता करता नित्यनेमाने गाड्या व्हाया मुशर्रफ-मोदी फोनकॉल, खोपकरांचं कालकल्लोळ, नराला मारून टाकणारी रंगभरीत मादी कोळीण, मित्रमंडळींबरोबरच्या गोवा-महाबळेश्वर वा-या, नोबेल पारितोषिकं, अलिकडच्या नव्याको-या ओळखी, पुस्तक संग्रह - एक डायलेमा, कार्ला-भाजा लेणी, भगतसिंग-राज-दिलीप-देव ते विकी-सान्या, थोड्या उखाळ्यापाखाळ्या, बरंच गॉसिप, अशी वाटावळणे घेत सुसाट धावत राहिल्या. रस्त्यात ह्यावेळी गुरुराजच्या चहासोबत दीपकच्या सामोसे गुलाबजामांचे थांबे होते. आधी ठरवल्याप्रमाणं दोन किलो कचोऱ्या आणि दोन किलो गुजांचा वायदा झालेला आणि संपवण्याची जबाबदारी माझ्याकडं लागलेली. खरं दीपक फरसाणवाल्यांनी नेमका मोडता घातला आणि मामांना काय वायदा पुरा करता आला नाही. नाही तर आज निम्म्या टिंबर मार्केटची तरी चंगळ कुठं जात नव्हती. मग घेतलं आपलं मी भागवून कसंतरी.