म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, January 27, 2022

 अवचटकाकांना सादर भावांजली. मोठं माणूस गेलं.

वाचनाचा एक विशिष्ट संस्कार त्यांच्यामुळे झाला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला त्यांनी एक सामाजिक प्रगल्भता दिली असं म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. माझी त्यांची ओळख त्यांच्या सा. सकाळच्या दिवाळी अंकातल्या दीर्घ लेखांनी झाली. खूप अंक खूप वर्षं जपून ठेवले होते. किती विषय आणि केवढी माणसं, संस्था समजत गेल्या. मग पुस्तकांचा लळा लागला.
अनेक वर्षांपूर्वी Sachin Warghadeमुळे पहिल्यांदा भेट झाली. पहिल्याच भेटीत भरपूर गप्पा, ओरिगामी भेटवस्तू आणि बासरीवादनाची ट्रीट मिळाली. तोवर फक्त वाचत होते, नंतर 'कार्यरत'मधल्या जाणत्या माणसांना नव-याच्या कामानिमित्त प्रत्यक्ष बघता आलं.
कोणत्याही वयोगटाला कोणत्याही निमित्ताने भेट देण्यासाठी ठराविक पुस्तकांच्या छोट्याशा यादीत 'छंदांविषयी' हे वरच्या क्रमांकावर आहे. जे भेट दिलेल्या सर्वांना, अगदी वाचनाची फारशी आवड नसणा-या व्यक्तींनाही हमखास पसंत पडत आलंय. 'स्वतःविषयी' आजही केव्हाही वाचताना खूप शंकांचं निरसन होत रहातं.
ते अनोळख्यांनाही कधी परके वाटलेच नसतील, पण मैत्रिणीचे बाबा म्हणून थोडंफार आणखी जवळून पहाता भेटता आलं हा सुखद योग. त्यांना आवडलेलं आणि त्यांच्या तोंडून ऐकलेलं 'गली में आज चाँद निकला' ही विशेष आनंदाची आठवण आहे.
मी कोल्हापुरात येताना काहीही लागलं तर भेट असं म्हणून त्यांनी आवर्जून काही संपर्क क्रमांक दिले होते आणि मी पाठवलंय असं सांग म्हणाले होते.
Yashoda, सांभाळा दोघी.

No comments:

Post a Comment