म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, January 9, 2022

 पं. रामदास कामतांना मनःपूर्वक अभिवादन. श्रद्धांजली, आदरांजली हे शब्द अगदी नको वाटतात.

फार आवडते गायक. मला नाट्य-भाव-भक्तीसंगिताची गोडी लागण्यातला मोठा वाटा त्यांच्या गायनाचा आहे. पहाटेच्या प्रभातवंदनपासून दिनसांगतेच्या नाट्यगीत-शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमांपर्यंत पं. अभिषेकीबुवांइतकेच त्यांचे गुणी शिष्य कामतही आकाशवाणीवरून नियमित कानावर पडत राहिले. घरी त्यांच्या नाट्यगीतांची एक एलपी होती, ती सतत वाजवली जायची. काहीही करताना मन प्रसन्न राहील असं काही ऐकायचं असेल तर कामतांची गाणी हा नित्याचा चॉईस आहे. इतक्या वर्षात आजवर कधीही कंटाळा म्हणून आलेला नाही. स्वच्छ, खणखणीत आणि रसाळ गायन हे वैशिष्ट्य असणारे कामत सदैव स्मरणात राहतील.


No comments:

Post a Comment