कानावर कडाकडा बोटं मोडली या चिमुरडीसाठी मी.
ऐन कोल्हापुरात म्हणजे शिवाजी रोडवर गंजी गल्ली परिसरात वाढूनही मी असं कोल्हापुरी बोलू शकत नाही. असं सोडा, साधं नेहमीचं कोल्हापुरीसुद्धा माझ्या तोंडात कधी बसलं नाही. मीच कशाला, आमच्या घरातलं कोण पण कोल्हापूरी बोलत नाही. बहिणाबाईंकडनं अपेक्षा करता येती अजूनही, खरं तो पडला लहरी महंमद.
तसं ठरवलं तर मी पण बोलू शकतोय, सोडा. बोली आणि अगदी शिव्यांसकट ठेवणीतला शब्दसंग्रह वगैरे सगळा ऐवज आहेच की खजिन्यात. खरं हा हेल, तोरा आणि ठसका कुटनं आणू!
लेकानं तरी पहिल्यापासनं तो लहजा उचलला, नशीब. शाळेच्या पहिल्याच दिवशी कुणाला तरी आडगं ठरवून रिक्कामा झालेला बहाद्दर. आणि आवडीनं बोलतंय ते तसं, हे विशेष.
मी पण गंज चढू ने म्हणताना कधीतरी आवसंपुनवंला तसं बोलतोय, खरं लेक नाकं मुरडू मुरडू म्हणतो, ए नको गं बाई तू कोल्हापुरी बोलू, अजिबात शोभत नाही तुझ्या तोंडी
दु:क्कं हाय वो ह्ये, काय सांगायचं आता तुमानी
ते न्हवं, ही बारकी तुमच्या कुणाच्या वळकीची असंल तर कोण तर तिच्या आईला सांगा जावा तिची दिष्ट काडायला
जलमभर अश्शी बोलत ऱ्हा म्हणावं, कोण काय नावं ठिवली तर खड्ड्यात जाऊं दे तेनास्नी.
हितं आमी लोकांना बोलवू बोलवू रेकॉर्ड करून घ्यायलोय असली बोलणी! काय वणवा का काय म्हणायचा आता हा!
#reel currently not available. कोल्हापुरातली एक चिमुरडी अभ्यास करताना ताईशी ज्या लहजात बोलतेय, अभ्यास का जमत नाही ते सांगतेय, ते अतिशय लोभस आहे.
No comments:
Post a Comment