म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, November 21, 2021

 #winteriscoming

वरणावांगं
पश्चिम महाराष्ट्रात ऑटाफे असणारं आणि वर्षभर केलं जाणारं कॉम्बो. ओल्या पावट्याच्या शेंगांना इकडे वरणा म्हणतात. देखणा शब्द आहे की नाही? जरी वर्षभर मिळत असला तरी हिवाळ्यातल्या कोवळ्या दाण्यांची चव खरी, शिवाय ह्या वातूळ भाज्या पचण्यासाठीही सडकून भूक लागणारा आणि खाल्लेलं नीट जिरवणारा हा ऋतू उत्तम. फक्त दाण्यांची सरसरीत आमटी किंवा वांग्याबरोबर अशी दोन प्रकारे विशेष आवडीनं खाल्ली जाते. बाकी मग घरागणिक वेगवेगळे प्रकार आहेत.
मी वरणा थोडं मीठ घालून आधी वेगळा शिजवून घेते. मग नेहमीच्या फोडणीत कढीलिंब, हिंग, हळद आणि भरपूर कोल्हापूरी कांदालसूणमसाल्यावर (इकडे त्याला चटणी म्हणतात) वांग्याच्या फोडी परतून दाणे, दाण्यांबरोबरचं पाणी मिसळून कडकडीत आधणाचं पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर पंधरा मिनिटं भाजी शिजू द्यायची. भाजीत मीठ घालताना बेतानं. वरणा शिजवतानाचं आणि कांदा लसूण मसाल्यातलं मीठ लक्षात ठेवून. बास. कोथिंबिरीनं भाजी झाकली गेली असती, म्हणून फोटोनंतर घातली.
कांदा, दाण्याचं कूट, टोमॅटो, वेगळा लसूण किंवा ओलं खोबरं, गूळ, गोडा मसाला हे सगळं ऐच्छिक आहे.
Tender Field Beans and Eggplant Combo-
A winter special and fav combination in western Maharashtra. Pressure cook the beans with a little salt separately. Some extra whistles needed. Keep aside. Heat some oil, add mustard seeds, curry leaves, asafoetida, turmeric, and plenty of Kolhapur special kanda-lasun-masala (called Chatani). Mix the cut eggplant, add the cooked beans, adequate boiled water, and adjust the salt. The cooked beans and Kolhapuri Chatani contain salt already. Cover, let it cook on low heat, and you are done.


No comments:

Post a Comment