म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, May 21, 2021

 न्यू एज्युकेशन सोसायटीचं पाल्हाळ लई मोठं होईल. प्रसन्न रंग दिलेल्या देखण्या प्रशस्त इमारती, ऐसपैस व्हरांडे आणि जिने, मोठाले हवेशीर वर्ग, मुलांनी गजबजलेलं भव्य आणि सर्व बाजूंनी सुरक्षित मैदान, मधेच असलेली दोन जुनी दगडी देवळं, स्वत:चा स्वतंत्र सांस्कृतिक हॉल असा सोसायटीचा पसारा नुसता आठवला तरी अभिमान वाटतो. अभ्यासाबरोबरच खेळ आणि काव्य शास्त्र विनोदाची गोडी इथेच लागली. शाळेत जायचा कधीच कंटाळा आला नाही.

कोणत्याही इमारतीतून संपूर्ण आवार दृष्टिपथात येतं. त्यातही तिस-या मजल्यावर उभं राहिल्यावर एकीकडे हॉकी किंवा फुटबॉल सराव, गडकरी हॉलसमोर एनसीसी परेड, समच्या बाजूला पीटीचा तास, पद्माराजे समोर लेझिमच्या खुळखुळत लवलवत्या रांगा, रानासामाणीच्या कोप-यात चिंडाकणी मुलं मुली खेळताना दिसणार. आता आवारात बरेच बदल झालेत, पण हे जिवंत दृश्य आजही बदललं नसणार. मी बाहेरून रस्त्यावरून बघत बघत जाते, खूप वर्षात तिसऱ्या मजल्यापर्यंत वर गेले नाही.

No comments:

Post a Comment