परवा ग्रुपवर एक इमारतींनी वेढलेला आणि पाणी साचलेला पेटाळा मैदानाचा फोटो शेअर झाला आणि खूप आठवणी जाग्या झाल्या. बालवाडी डी.एड. कॉलेजच्या तळमजल्यावर, प्राथमिकला रा.ना. सामाणी, माध्यमिक पद्माराजे आणि उच्च माध्यमिक स.म. लोहिया ज्युनिअर कॉलेज. ही सगळी वर्षं खूप आनंदाची होती. वडील संस्थेचेच कर्मचारी असल्यामुळे बालवाडी ते बारावी सलग तेरा वर्षं न्यू एज्युकेशन सोसायटीचं हे आवार माझ्यासाठी जवळजवळ दुसरं घर होतं. सगळ्या संस्थातले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मला आणि मी त्यांना ओळखत असल्यामुळे कुठेही कधीही बागडायचं स्वातंत्र्य होतं. ही कथा संस्थेच्या सगळ्याच कर्मचा-यांच्या मुलांची होती. मला ह्याचा सगळ्यात मोठा फायदा तिन्ही शाळांच्या लायब्र-या वापरताना झाला. वाचनाची गोडी त्यामुळे लागली. पद्माराजेला पित्रे बाई, समला देवलसर आणि न्यू हायस्कूलला मोहन भांडवलेसर लायब्ररियन होते. पित्रे बाई एरवी प्रेमानं बोलायच्या, पण पुस्तकं बाहेर द्यायच्या नाहीत, तिथेच बसून वाचायची. किंवा आठवड्यातून एकदा वर्गात पुस्तक पेटी यायची त्यातून घेऊन वाचायची आणि पुन्हा पेटीतच ठेवायची. हे शक्यतो ऑफ तासाला असायचं. समला जाणं तसं लांब (!?
No comments:
Post a Comment