ढगाळलेल्या रविवारी सकाळी शाल ओढून आवडत्या पुस्तकात बुडी मारून इटींग स्नॅक्स अॅंड माईंडींग युवर ओन बिझनेस इज प्राईसलेस वगैरे.
Saturday, June 25, 2022
Chaitanya Dixit Omkar Diwan
Saturday, June 11, 2022
रोज ऑफिसातून बाहेर पडल्यावर वाटेत बालगंधर्वच्या आवारातल्या फलकावरचे अपडेट वाचून रस्त्याला लागत होते, त्यादिवशी गेटमधूनच फलकावरचा हार बघितला आणि कंबर खचली. २००० सालची ती संध्याकाळ वाईट होती. तुमचं दर्शन तर दुसऱ्या दिवशीही मिळालं नाही, पण बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कोपऱ्यावर चारपाच तास उभी राहून भोवतीनं वाढणारी गर्दी आणि समोर होत राहिलेली बडी वर्दळ हमसून रडत बघत राहिले. आज ते दृश्य नुसतं आठवतानाही डोळे डबडबतात. खरं म्हणजे हे लिहिण्याचं काहीही प्रयोजन नाही, पण तशी वेदना परवाच्या फेब्रुवारीत पुनश्च अनुभवली. हे व्यक्त करणंही आता थांबवलं पाहिजे.
Thursday, May 26, 2022
तारकर्लीला घडलेली घटना भयंकर आहे. त्यावरून पंधरा सोळा वर्षांपूर्वीची एक आठवण झाली.
Tuesday, May 17, 2022
एखादं कितीतरी जुनंच गाणं पहिल्यांदा ऐकलं की ऐकण्याच्या बाबतीत आपण अजून फारच बच्चे आहोत, हा आधीच कुरतडणारा न्यूनगंड आणखी वाढीला लागतो. माझ्याबाबतीत हे नेहमीचंच आहे.
Tuesday, May 10, 2022
आवडलीये.
मन:पुर्वक आदरांजली, पंडितजी.
Monday, May 9, 2022
आपल्याच आईला अभिवादन वगैरे फार कृत्रिम होईल, नाही?
Saturday, April 23, 2022
टाळेबंदीत चिरंजिवांनी सुरू केलेल्या घरच्या पुस्तकनोंदीत माझी भर शून्य पडली आहे. मुलं खरंच आपल्यापेक्षा शिस्तबद्ध असतात. नेमानं रोज पुस्तकं एक्सेल शीटमध्ये भरत होता. वाचून झालेल्या पुस्तकांच्या पण (गटणेछाप नव्हे) छोट्या नोंदी ठेवतो तो. असं असूनही त्याच्या संस्कारांचा माझ्यावर मात्र अजूनही ढिम्म परिणाम नाहीये
Monday, April 18, 2022
Monday, March 7, 2022
Saturday, March 5, 2022
गेल्या सहा तारखेला रविवार होता ही एक ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात तशातली गोष्ट. आजही सहा तारीख आणि रविवार. काही घटना पचवण्यारिचवण्यासाठी - मुळात स्विकारण्यासाठी - एक उसंत मिळावी लागते, ती त्या रविवारानं समस्तांना दिली, हे खरोखर फार सुदैव होतं.
Saturday, February 26, 2022
नजिकच्या कालखंडात माझ्या ग्रहमानात 'शिव्या'दानाचा योग आहे आणि त्या मी कचकावून देणार आहे. वाढीचं वय कोल्हापुरात गेलेल्यांच्या समृद्ध शिव्यासंग्रहाबद्दल अवाक्षरही वेगळं बोलायला नको, तसा तो माझाही आहे. आमचा शेजार एवढा देदिप्यमान होता की आम्ही जागेच शिव्या ऐकत व्हायचो आणि आमचं बेला के फूल, रजनीगंधा वगैरेही शिव्यांचंच असायचं. योगायोगानं आताही हे दान देदिप्यमान शेजाराची परंपरा कायम राखणा-याच्या पदरातच घालायचं आहे, त्यामुळे झक्कपैकी एक वर्तुळही पूर्ण होणार आहे.
Friday, February 18, 2022
Friday, February 4, 2022
पांघरुण खूप आवडला.
Wednesday, February 2, 2022
आकाशवाणीवरचे माहितीपर कार्यक्रम आवर्जून सर्वांनी ऐकण्यासारखे असतात. विषयवार नेमून ठेवलेले स्लॉट्स असतात आणि त्यातल्या उपविषयांवर अभ्यास असणारे वक्ते, नागरीक बोलावले जातात.
Thursday, January 27, 2022
अवचटकाकांना सादर भावांजली. मोठं माणूस गेलं.