लॉस्ट रेसिपीजच्या हिमाचली भागात 'सुपारी का मद्रा' हा पदार्थ बघितला. अख्ख्या सुपाऱ्या आठ ते दहा दिवस भिजत घालून मऊ करायच्या, दुधात शिजवून घेऊन कडवटपणा काढायचा (देखणा गुलबट रंग उतरलेलं ते दूध नंतर फेकतात बहुतेक), पुन्हा दह्याखोव्यादुधात भरपूर मसाले परतून रसभाजी केली होती. सुपारीची भाजी कोकण किंवा एकंदरच किनारपट्टीत जिथे जिथे सुपारी पिकवली होते, तिथे केली जाते का? ऐकिवात नसल्यामुळे कुतूहल वाटलं. शिवाय इतक्या वरच्या पट्ट्यात, जिथे कोणतीच सामग्री सहज उपलब्ध असत नाही, तिथे एकजात सगळे महाग आणि दहीदूधखवा वगळता आयात जिन्नस वापरून असा एखादा पदार्थ कसा काय रांधला गेला असेल? ही कल्पकता वाटली. उच्चवर्गीयांकडून सांपत्तिक प्रदर्शन म्हणून केली जात असेल का? असे भौगोलिकदृष्ट्या एकमेकांशी घटकसंबंध नसणारे जुने पदार्थ आणखी कोणते आहेत का? आता सगळे पदार्थ सगळीकडे होतात, म्हणून जुने विचारलं.
No comments:
Post a Comment