म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, May 18, 2024

 ब्रिजरटनच्या तिसऱ्या सीझनमध्ये ब्रिजरटन कुटुंबाच्या घराचा नव्यानं सामील होणारा भाग आणि त्यासाठी नेपथ्य उभं करणाऱ्या कला दिग्दर्शन टीमचे हे कष्ट.

व्हायकाउंट ऍंथनी ब्रिजरटन आणि त्याची नवपरिणित वधू केट यांची नेत्रसुखद बैठक आणि शयनगृह. येणाऱ्या सुनेचं स्वागत आणि उमरावाच्या मरातबाला साजेसा देखावा उभा करताना टीमनं काय काय केलं हे बघणं मालिकेएवढंच छान आहे.
ब्रिजरटनांच्या घरात आधीच्या सीझनमध्ये वापरलेल्या रंगांशी मेळ खाईल अशी नव्यानं आणलेली रंगसंगती आणि त्यामागची कारणमीमांसा, भित्तीचित्रांचे तपशील, गोंडे लावलेले पडदे, पलंगपोस, आभ्र्यांसाठीच्या कापडांसाठी केटच्या अभिजात भारतीय पार्श्वभूमीचा आणि ब्रिटिश-भारतीय संयोगाचा बारकाईनं केला गेलेला विचार, तत्कालीन उच्चभ्रू राहणीमान दाखवणारं कलात्मक फर्निचर आणि सजावट.
'क्लासिक ब्रिजरटन पॅलेट' हा खास शब्दप्रयोग ठसवणारी मेहनत घेतली आहे.
ब्रिजरटन नेटफ्लिक्सवर आहे. पिरीअड ड्रामा बघायला आवडत असतील तर ही मालिका अतिशय प्रेक्षणीय आहे. माझा ओटीटीचा प्रवास डाऊनटन ऍबीपासून सुरू झाला होता. या क्लिपमुळं त्या मालिकेच्या तांत्रिक बाजू बद्दल वाचायला पाहिजे हे लक्षात आलं.
https://www.facebook.com/reel/1501229760799708

No comments:

Post a Comment