उषाताई, ८९व्या वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा
चार वर्षांपूर्वी म्हणाले तेच सगळं आज पुन्हा म्हणते.
दीदी गेल्यानंतर तुमच्या एक दोन चुकारमाकार मुलाखती ऐकता आल्या, एवढाच काय तो बदल. त्यातही जेवढ्यास तेवढं मोजकं बोलणं. उगीच आठवणींचे कढ काढणं नाही की हळवं होणं नाही. तुम्ही ज्या वयात आहात, त्या वयात असं ओरिएंटेड असणं तितकं सोपं नसावं. म्हणून आणखी कौतुक वाटलं.
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो.
No comments:
Post a Comment