पुस्तक या गोष्टीभोवती आठवड्यापेक्षा जास्त काळ घोटाळणारी इतकी अभूतपूर्व गर्दी ही प्रसन्न घटना आहे. लोक पुस्तकं नुसती विकत घेतात, वाचतात का या प्रश्नावर शशिकांत सावंतांनी मार्मिक उत्तर दिलं, की आपल्या कॉलनीत एखादा सिने स्टार राहत असेल तर नुसतं त्यामुळेही आपल्याला बरं वाटत असतं.
अनेक लोकांना "मार्क्ड सेफ फ्रॉम पुणे बुक फेस्टिवल" असं म्हणताना बघितलं. त्यात काही चांगले वाचक पण दिसले. गंमतीतही लिहिलं असेल. पण बाकीच्या अविरत उठणाऱ्या लाटांमध्ये या पोस्टींच्या लाटा आनंददायी नाहीत का? भले लोक सवाईसारखं स्टेटस म्हणून जावोत, इंस्टा स्टोरीसाठी जावोत, खाण्यासाठी जावोत की निव्वळ उत्सुकता म्हणून. सवाई की पुस्तक महोत्सव असाही हवाहवासा गोंधळ उडाला असेल काहींचा. चांगलं आहे की.
जे अजून जमवू शकले नाहीत, त्यांनी आज थोडा वेळ काढून जा, भरपूर फोटोंसह पोस्ट शेअर करा आणि आणखी चार लोकांना जाऊन येण्यासाठी उद्युक्त करा. आज ट्रॅफिक आणि पार्किंगमध्ये बराच वेळ जाईल ही तयारी ठेवून जा.
No comments:
Post a Comment