मदुराईचं प्रसिद्ध पेय 'जिगरठंडा'
उन्हाळा रंग दाखवायला लागला आहे तर त्याला तोंड देताना बाकीच्या पेयांबरोबर यंदा याचीही वर्णी लावता येईल. मला हा प्रकार अतिशय आवडला आणि प्यायल्यावर जीव खरोखरच गार झाला. नाव अगदी सार्थ आहे.
ही आपली नेहमीची रव्याची खीर असावी. खवा लावून किंचीत दाटसर केली आहे आणि गारेगार करून वाढली आहे. दूध आटवल्यासारखं वाटलं नाही. आटवलेल्या दुधाचा आणि खवा लावलेल्या दुधाचा दाटपणा निरनिराळा असतो. पेयातले सगळे घटक समजले नाहीत. जाणकार अधिकारानं सांगू शकतील. ज्यांना नीट रेसिपी माहीत आहे त्यांनी प्लीज लिहा.
आम्ही घरी एरवीही नेहमीच रव्याची खीर पीत असतो. चहा किंवा कॉफीच्या ऐवजी, मधल्या भुकेला किंवा असंच मूड आला की. आजारपणं तर रव्याच्या खिरीवर निभतात. पण ती उन्हाळ्यात थंड करून पिण्याचं मला तरी कधी सुचलं नव्हतं. हा एक चांगला पर्याय सापडला मला.
पोस्ट एडीट - अनेक रेसिपीज शेअर झाल्या आहेत. पण रवा नाहीये त्या एकाही रेसिपीत. मी जिगरथंडा मदुराईतल्या अतिशय नामवंत आणि तुफान गर्दी असलेल्या दुकानात प्यायले. तिथेच काढलेला मी प्यायलेल्या पेयाचाच फोटो डकवला आहे आणि त्यातले शिजलेल्या रव्याचे पार्टिकल्स अगदी फोटोतही स्पष्ट दिसतायत. मी जाम बुचकळ्यात पडले आहे. आता जे मूळ व्हर्जन असायचं ते असो, मी आपली रव्याची खीर गार करून, कधी आईस्क्रीम घालून तर कधी खवा लावून जिगरथंडाचं माझं माझं व्हर्जन करावं म्हणतेय
जिगरथंडा या पेयात गोंद कतिरा हा घटक असतो, जो रात्रभर भिजत घालून फुलवायचा आणि पदार्थांमध्ये वापरायचा असतो.
No comments:
Post a Comment